पुणे

पुणे : जिल्ह्यात वीस लाख जणांकडे आभा हेल्थ कार्ड

अमृता चौगुले

नरेंद्र साठे

पुणे : सर्व वैद्यकीय माहिती ऑनलाइन साठवून ठेवण्याच्या हेतूने केंद्र सरकारने आयुष्मान भारत आरोग्य खाते (आभा) नावाचे डिजिटल हेल्थ आयडी कार्ड सुरू केले आहे. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत 20 लाख 30 हजार जणांनी हे 'आभा'चे हेल्थ कार्ड काढले आहे.

असे काढा कार्ड…
आभा कार्ड काढण्यासाठी मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. पवहा. र्सेीं. ळप या वेबसाईटवर जाऊन हेल्थ कार्डच्या नावाखाली माहिती उपलब्ध आहे. तेथे मक्रिएट हेल्थ आयडीफ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर वेबपेजवर आधार कार्डच्या माध्यमातून किंवा मोबाईल फोनद्वारे हेल्थ कार्ड जनरेट करण्याचा पर्याय आहे. आधार क्रमांक किंवा फोन नंबर टाकल्यास एक ओटीपी मिळेल. ओटीपी टाकून तो व्हेरिफाय करावा लागेल.

काय उपयोग होणार?
यापूर्वी कोणत्या आजारावर उपचार झाले, कोणत्या रुग्णालयात झाले, कोणत्या चाचण्या करण्यात आल्या, कोणती औषधे दिली, रुग्णाला नेमके कोणते आजार आहे आणि रुग्ण एखाद्या आरोग्य योजनेशी संलग्न आहे का, आदी माहिती या हेल्थ कार्डमध्ये समाविष्ट असेल.

आता केवळ आभा कार्ड पुरेसे…
जुन्या चाचण्यांचे रिपोर्ट नसतील तर डॉक्टर पुन्हा सगळ्या चाचण्या करायला लावणार नाहीत. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल. याच्या वापराला सुरुवात झाल्यानंतर डॉक्टरकडे पूर्वीची कागदपत्रे घेऊन जावी लागणार नाहीत.

चौदा अंकी क्रमांक कार्डवर

डिजिटल हेल्थ कार्डवर चौदाअंकी क्रमांक असेल. त्या क्रमांकाद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तीला ओळखले जाईल. त्या माध्यमातून कोणत्याही रुग्णाची पूर्वीच्या आजारांची माहिती उपलब्ध होईल.

रुग्णाच्या सहमतीने तुम्ही आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आरोग्यासंबंधीची माहितीही सांभाळून ठेवू शकता. हे कार्ड नि:शुल्क असून, ते अनिवार्य नसेल. मात्र, प्रत्येकाने याचा वापर करावा, यासाठी प्रयत्न असणार आहे.
                                                                         – डॉ. विजय वाघ,
                                                 उपजिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

SCROLL FOR NEXT