पुणे

कामशेत : बिबट्याच्या हल्यात दोन शेळ्या मृत्युमुखी

अमृता चौगुले

कामशेत : मावळ तालुक्यातील पाले गावातील पठार डोंगरावर बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी चार वाजता दरम्यान घडली.  या घटनेमुळे लक्ष्मण जानकु भगत या शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी कान्हे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्या दिसला होता. त्यामुळे मावळ परिसरात भितीवरचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच ही अशी घटना झाल्यामुळे पाले मावळ परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लक्ष्मण भगत हे नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी पाले येथील पठार डोंगरावर गेले असतात तेथे अचानक आलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात त्यांच्या दोन शेळ्या मृत्यू पडल्या. प्रशासन भरपाई द्यावी, अशी मागणी भगत यांनी केली आहे. तसेच, वनविभागाने जागोजागी पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावे, अशी मागणी तेथील ग्रामस्थ करत आहे.

SCROLL FOR NEXT