पुणे

Crime news : लोणावळ्यात दोन मुलींचे अपहरण

अमृता चौगुले

लोणावळा : लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातून दोन मुलींचे अपहरण करत त्यांना एका घरात डांबून ठेवत त्यांच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना लोणावळा शहरात घडली आहे. विशेष म्हणजे यात एक अल्पवयीन मुलाचा समावेश असून तिच्या आईने व दुसर्‍या पीडित युवतीने याबाबत लोणावळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोणावळ्यातील क्रांतीनगर, हनुमान टेकडी येथील एका घरात हा सर्व प्रकार घडला आहे. यातील पहिली अल्पवयीन पीडित मुलगी ही मूळची कळंब, उस्मानाबाद येथील आहे. ती लोणावळा रेल्वे स्थानकाजवळील उभी असताना तिला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पळवून नेऊन क्रांतीनगर येथील एका घरात साखळीने बांधून ठेवले. उष्टे अन्न खायला घातले. तसेच., काम न केल्यास हाताने, पक्कडीने, सळईने मारहाण केली तसेच तिच्यासोबत जबरी संभोग केला असल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने दिली आहे.

दोघींनाही केली मारहाण 
फिर्यादीवरून बेताल आनंद पवार (सलट), मंदा बेताल पवार (सलट), संजना बबलू पवार (ठाकूर), बबलू पवार (ठाकूर), अर्चना बेताब पवार (सलट), किरण बेताब पवार (सलट), मोनिका बेताब पवार, राज सिध्देश्वर शिंदे व करीना राज शिंदे (सर्व रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी पीडित महिला ही 22 वर्षांची असून जाफरनगर, उत्तरप्रदेश भागातील आहे. ती लोणावळा रेल्वे स्थानक भागात एका दुकानासमोर उभी असताना पंधरा दिवसांपूर्वी तिला काही जणांनी पळवून नेऊन क्रांतीनगर येथील एका घरात डांबून ठेवले होते. त्यानंतर तिला मारहाण करत जखमी करण्यात आले. दरम्यान, दोघांनी तिच्यावर जबरी संभोग केला. त्यांचा मोबाइलदेखील काढून घेण्यात आला असल्याचे तिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून करीना राज शिंदे, मंदाकिनी बेताब पवार, संजना बबलू ठाकूर, बबलू पवार, राज सिद्धेश्वर पवार, बेताब आनंद पवार, ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे (सर्व रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT