पुणे

पुणे : दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी,लोणीकंद व लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे- नगर रोडवरील लोणीकंद येथील विठ्ठलवाडी कमानीसमोर पादचार्‍याला भरधाव वेगातील वाहनचालकाने धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने पादचार्‍याचा मृत्यू झाला. गुणवंत पप्पुर्डा इंगळे (वय 55, रा. कटकेवाडी, लोणीकंद, मूळ- अकोला) असे पादचार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी, त्यांचा मुलगा अश्विन इंगळे (वय 24) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे 25 फेब—ुवारी रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास रस्त्याने चालत निघाले, त्या वेळी वाहनचालकाने त्यांना धडक दिली. तर पुणे-सासवड रस्त्यावरील झुम हॉटेलच्या समोर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. आकाश रमेशकुमार भक्त (वय19, रा. संभाजीनगर उरुळी देवाची, मूळ -बिहार) असे त्याचे नाव आहे. आकाश दुचाकीवरून निघाला असताना, अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी, त्याचे वडील रमेशकुमार भक्त (वय 46) यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 25 फेब—ुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

SCROLL FOR NEXT