लोणंद रेल्वे स्थानक Pudhari
पुणे

Amrut Bharat yojana: अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद रेल्वे स्थानकाचा कायापालट

या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन येत्या 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे

पुढारी वृत्तसेवा
  • अत्याधुनिक सुविधा, सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग एरिया, नवीन लाईनची कामे पूर्ण

  • सुसज्ज रस्ते, प्रतीक्षालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

  • 24 डब्यांची गाड्या उभ्या राहण्यासाठी दोन प्लॅटफॉर्म सज्ज

  • लवकरच आणखी दोन प्लॅटफॉर्म आणि एक गुडस स्टोरेज रूम तयार होणार

पुणे: अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन येत्या 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या निमित्ताने पत्रकारांचा पाहणी दौऱ्याचा आयोजन करण्यात आले होते.

लोणंद रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी केंद्र सरकारने आत्तापर्यंत दहा कोटी 48 लाख रुपये पहिल्या टप्प्यासाठी मंजूर केले आहेत. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने येथील सर्व कामे पूर्ण केले असून, आता या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे.

नव्या लोणंद रेल्वे स्थानकावर काय आहेत सुविधा...

- अत्याधुनिक सुविधा, सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग एरिया, नवीन लाईनची कामे पूर्ण

- सुसज्ज रस्ते, प्रतीक्षालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

- 24 डब्यांची गाड्या उभ्या राहण्यासाठी दोन प्लॅटफॉर्म सज्ज

- लवकरच आणखी दोन प्लॅटफॉर्म आणि एक गुडस स्टोरेज रूम तयार होणार

- दिव्यांगांसाठी तिकीट काउंटर आणि स्वतंत्र रॅम्प व्यवस्था

- प्रवाशांना माहिती मिळावी यासाठी दोन नवीन डिजिटल बोर्ड 

- सीईजी कन्सल्टन्सी मार्फत रेल्वे स्थानकाचा विकास

- दिवसभरात पाचशे प्रवासी करतात ये-जा

- तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबे, यात कोयना, महाराष्ट्र आणि सह्याद्री एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश

- स्थानकाला पर्यावरण पूरक रंगरंगोटी, पर्यावरण संवर्धन जनजागृतीचा संदेश

- प्रवाशांना बसण्यासाठी नवीन आसन व्यवस्था

- नवीन सुसज्ज इमारती, आरपीएफ कार्यालय

- नवीन सुसज्ज प्रवेशद्वार

- 19,402 स्क्वेअर मीटर मध्ये स्थानकाचा विकास

- हिरवागार परिसर

- पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतर 9 ऑगस्ट 2023 मध्ये कामाला सुरुवात

- 19 महिन्यात झाले काम पूर्ण

- स्थानकावर ठिकठिकाणी माहिती दर्शक फलक लावण्यात आले आहे.

 पंतप्रधान यांच्या अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद स्थानकाचा विकास केला जात आहे. तब्बल १०.४७ कोटी गुंतवणुकीतून हा विकास करण्यात आला आहे. यात नवीन स्टेशन प्रवेशद्वार, आधुनिक बुकिंग ऑफिस आणि कॉन्कोर्स, नवीन प्रवेश/निर्गमन दरवाजे आणि कंपाऊंड वॉल यांचा समावेश आहे. कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग झोन करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १ मध्ये आता एक नवीन प्रतीक्षालय तयार केले आहे. शौचालय सुविधांचे नूतनीकरण करण्यात आले आहे आणि दिव्यांगजनांसाठी अनुकूल बनवण्यात आले आहे. यासह मल्टीलाइन, एलईडी डिस्प्ले बोर्ड, जीपीएस-सक्षम घड्याळे आणि स्वयंचलित घोषणा प्रणाली यासारख्या प्रवासी माहिती प्रणाली लागू करण्यात आल्या आहेत.
हेमंत कुमार बेहरा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
 पूर्वीपेक्षा लोणंद रेल्वे स्थानक आता अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज दिसत आहे. येथे आम्हाला पार्किंगच्या सुविधेसह वातानुकूलित प्रतीक्षा लय आणि परिसरात चांगली स्वच्छता यासह येथे अनेक ठिकाणी विकास झाल्याचे दिस पाहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकामुळे आमच्या या गावचा आणखी विकास होणार आहे. रेल्वे स्थानकाचा विकास केल्यामुळे केंद्र सरकारचे आभार.
शिवाजी भोसले, बाळ लोणंदकर, प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT