पुणे

पुणे विभागातील 45 नायब तहसीलदारांच्या बदल्या

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्या ह्या 31 मेच्या आत कराव्या लागणार आहेत. त्यानुसार बदल्यांचे आदेश जारी केले जात आहेत. पुणे विभागातील 45 नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव श्रीराम यादव यांनी जारी केले. त्यात पुणे जिल्ह्यातील 20 नायब तहसीलदारांचा समावेश आहे.

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातून सुयोग बेंद्रे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेत बदली करण्यात आली. सचिन मुंढे यांची फलटण येथून जुन्नर-आंबेगाव उपविभागीय कार्यालयात बदली करण्यात आली. निवडणूक शाखेतील राजेंद्र पवार यांची कडेगाव (सांगली) तहसील कार्यालयात नियुक्ती करण्यात आली. उत्तम बडे यांची पुरंदर येथून पाटण तहसील कार्यालयात बदली करण्यात आली.

सूर्यकांत कापडे यांची वेल्हे येथून कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तहसील कार्यालयात, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील गणेश लव्हे यांची शाहूवाडी तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. मिरज तहसील कार्यालयातील उमेश कोळी यांची करवीर उपविभागीय कार्यालयात, तर प्रशांत कसबे याची पुणे शहर येथून आटपाडी तहसील कार्यालयात बदली करण्यात आली. यांच्यासह एकूण 45 नायब तहसीलदारांचा बदलीमध्ये समावेश आहे.

SCROLL FOR NEXT