पुणे: बुद्ध पौर्णिमेनिमित्त सोमवारी (दि. 12) पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता आहे. अनुयायींची होणारी गर्दी लक्षात घेता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सोमवारी या भागातून जाणारी वाहतूक वळवली आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते साधू वासवानी रोडकडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनधारकांना बोलाई चौक ते पुणे स्टेशन चौक येथून पुढे अलंकार चौकातून इच्छितस्थळी जाता येणार आहे. (Latest Pune News)
फायर ब्रिगेड, पोलिस, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मात्र मार्ग मोकळा राहणार आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.