पुणे

रमजान ईदनिमित्त वाहतुकीत बदल

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गोळीबार मैदान चौक येथे ईदच्या निमित्ताने नमाज पठणाचा कार्यक्रम 22 अथवा 23 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नमाज पठण पूर्ण होईपर्यंत त्या परिसरातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. या वेळी पर्यायी मार्गाचा नागरिकांनी वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

…असा असेल वाहतूक बदल

सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चौक येथून गोळीबार चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- मम्मादेवी चौक बिशप स्कूल मार्गे किंवा कमांड हॉस्पिटल मार्गे वाहनचालकांनी जावे.
गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा नमाज पठणाच्या वेळी वाहतुकीसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग- गोळीबार चौकातून डाव्याबाजूस वळून सीडीओ चौक पुढे उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक, सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जावे.

सेव्हन लव्हज चौककडून गोळीबार मैदानकडे येणारी वाहतूक वाहतूक वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- सॅलेसबरी पार्क सी.डी.ओ. चौक भैरोबानाला येथून इच्छित स्थळी जातील.
भैरोबानालाकडून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून वळविण्यात येणार आहे. ही वाहने एम्प्रेसगार्डन व लुल्लानगरकडे मार्गे जातील.

पर्यायी मार्ग- प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने किंवा भैरोबानाला वानवडी बाजार चौक येथून इच्छित स्थळी जातील.
कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणार्‍या सर्व जड मालवाहतूक वाहने, जड प्रवासी बस, प्रवासी एसटी बस, पीएमटी बस यांना प्रवेश बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्गाचा वापर करून लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी वाहने जातील.
याखेरीज शहरातील अन्य भागांतील ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार आहे. त्या भागातील वाहतुकीच्या परिस्थितीनुसार तेथील वाहतूक बंद अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येईल. तरी वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे अवाहन वाहतूक पोलिसांनी केले

SCROLL FOR NEXT