पुणे : पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या आमिषाने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लग्नाबाबत विचारल्यावर जिवे मारण्याची धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चौघांवर अनुसूचित जाती व अनु. जमातीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दयानंद निळोबा फंड, विश्वजित दयानंद फंड (रा. शिरूर) यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 38 वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व दयानंद फंड हे ओळखीचे आहेत. दयानंद याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्या वेळी फिर्यादीचे त्याने खासगी क्षणांतील फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. विश्वजित याने जिवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर महिलेने सुरुवातीला शिरूर एमआयडीसीकडे तक्रार केली होती. तेथून ती सिंहगड रोडला वर्ग करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक राजूरकर तपास करीत आहेत