पुणे

पिंपरी : प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबीयांना आ. महेश लांडगे यांची मदत

अमृता चौगुले
पिंपरी(पुणे) : जगभरातील मराठा बांधवांना संघटित करून आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभा करणारे दिवंगत प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबीयांना भाजपचे शहराध्यक्ष आ.  महेश लांडगे यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.  सातारा जिल्ह्यातील प्रवीण पिसाळ या तरुणाने मराठा समाजासाठी संघटन करून 'वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन'ची स्थापना केली.
त्या माध्यमातून समाजातील तरुणांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा दिली. वैद्यकीय, रोजगार आणि व्यवसायात मदतीसाठी पुढाकार घेतला. मात्र, प्रवीण पिसाळ यांचे नुकतेच अकाली निधन झाले. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी पिसाळ कुटुंबीयांच्या घरी भेट देवून सांत्वन केले. तसेच, कर्तव्यनिधी म्हणून 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आणि पिसाळ यांची मुलगी शुभ—ा हिच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा मनोदय व्यक्त केला.

प्रवीण पिसाळ यांच्या आईला आश्रू अनावर

आमदार महेश लांडगे यांनी आर्थिक मदत करीत यापुढील काळात कुटुंबाला मदतीसाठी पुढाकार घेण्याचा मनोदय केला. विशेष म्हणजे, प्रवीण पिसाळ यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे प्रवीण पिसाळ यांच्या आईचा उर भरून आला. त्यांनी अक्षरश: हंबरडा फोडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वतः पाठपुरावा करीन आणि ज्या दिवशी ते साध्य होईल ती मराठा प्रवीण पिसाळ व त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली असेल. यापुढील काळात पिसाळ कुटुंबीयांसह मराठा समाजातील तरुणांना कोणत्याही अडचणीत मदत करण्यासाठी मी तत्परतेने प्रयत्नशील राहून समाजाच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे.
                                                               – महेश लांडगे, 
                                                    शहराध्यक्ष तथा आमदार, भाजप 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT