पुणे

भारत-आफ्रिका लष्करी सरावाचा थरार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार मानवतावादी भूसुरूंगविरोधी मोहीम आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुण्यात सुरू असलेल्या इंडिया-आफ्रिका लष्करी सरावाचा बुधवारी (दि. 29) समारोप झाला. भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, सर्व आफ्रिका प्रमुख आणि सहभागी अधिकारी सरावाचा प्रमाणीकरण टप्पा पाहिला गेला. आफ्रिका -इंडिया फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज या बहुराष्ट्रीय सरावात आफ्रिका खंडातील 25 राष्ट्रे आणि भारतीय सैन्यातील शीख, मराठा आणि महार रेजिमेंट यांच्यासह एकूण 124 तुकड्या सहभागी झाल्या होत्या.

आगीच्या, हल्ले व मदतीच्या कसरती
सरावादरम्यान आफ्रिकन सैनिकांना दंगे, दहशतवादी हल्ले परतवणे, आपत्कालीन व्यवस्थापन व वैद्यकीय मदत करण्यासाठी काय करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. हा सराव भविष्यात भारतीय आणि आफ्रिकी  सैन्यांमधील सहकार्यासाठी दिशा देणारा असल्याचे सांगितले गेले.

लष्करप्रमुखांचे मार्गदर्शन…
लष्करी कौशल्ये आणि क्षमता वाढवण्यासाठी आणि अशा ऑपरेशन्सच्या संचालनात आमची संयुक्त तंत्रे, रणनीती आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी एक अतुलनीय व्यासपीठ आहे. भारताने संरक्षण उत्पादन परिसंस्थेंतर्गत एक मजबूत सार्वजनिक आणि खासगी संरक्षण उद्योग निर्माण केला आहे, ज्यात मुबलक तांत्रिक मनुष्यबळाचा फायदा आहे. आम्ही लवकरच एििींं आणि थपिी डिस्प्लेद्वारे भारतीय संरक्षण उद्योगाच्या पराक्रमाचे प्रदर्शन करणार आहोत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले.

स्वदेशी उपकरणांचे प्रदर्शन….
सरावाच्या पार्श्वभूमीवर उपकरणांचे एक प्रदर्शन भरावण्यात आले. ज्यामध्ये 'मेक इन इंडिया' अंतर्गत उत्पादित 32 उद्योगांमधील 75 स्वदेशी लष्करी उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले. आफि—की लष्करप्रमुख, प्रमुखांचे प्रतिनिधी आणि आफि—की राष्ट्रांचे प्रतिनिधी यांनी उपकरणांची पाहणी करून सेल्फी घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT