पुणे

मंचर : मुक्तादेवी यात्रोत्सवात बैलगाडा शर्यतीचा थरार

अमृता चौगुले

मंचर; पुढारी वृत्तसेवा : खडकी (ता.आंबेगाव) येथे श्री मुक्तादेवी यात्रोत्सवात गेल्या चार दिवसात 814 बैलगाडे सहभागी झाले होते. सुमारे 30 हजार बैलगाडा शौकिनांनी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवल्याची माहिती यात्रेचे संयोजक आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादाभाऊशेठ पोखरकर यांनी दिली. यात्रेदरम्यान आमदार महेश लांडगे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत निकम, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अंकित जाधव आदींनी भेट देऊन यात्रा संयोजनाबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले.

यात्रा यशस्वी होण्यासाठी सरपंच नारायण बांगर, मंचर बाजार समितीचे संचालक दत्ता हगवणे, माजी उपसरपंच दीपक बांगर, रामदास वायकर, दत्ता भोर, अर्जुन बांगर, अशोक भोर, पांडुरंग पाटील, निखिल भोर, विशाल वाबळे आणि ग्रामस्थांनी प्रयत्न केले. पहिला दिवस फळीफोड अजिंक्य खांडेभराड चाकण 12:63सेकंद, घाटाचा राजा गोविंदशेठ खिलारी भराडी 12:07,फायनल मयूर हॉटेल मंचर 12:60. दुसरा दिवस फळी फोड आतिष बारणे मोशी 12:64, घाटाचा राजा राजूशेठ वसंतराव जवळेकर वाफगाव 12:21, फायनल राजुशेठ वसंतराव जवळेकर वाफगाव रोहनशेठ सस्ते मोशी 12:71. तिसरा दिवस फळी फोड रमेश शेलार सायगाव खेड 12:56, घाटाचा राजा डी साम्राज्य ग्रुप अवसरी 12:29, फायनल कै भगवान बाबूराव गावडे गावडेवाडी 12:80. चौथा दिवस फळी फोड दिनेश एकनाथ बांगर टाव्हरेवाडी 13:00, घाटाचा राजा कै सदाशिव महिपती लांडगे भोसरी 12:34 फायनल उत्तमराव भीमाजी गव्हाणे लांडेवाडी 12:66 सेकंद अशी वेळ नोंदवली. विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT