पुणे

पुणे : कॅन्टोन्मेंट मतदारयादीतून हजारो नावे वगळली ; काँग्रेस मागणार केंद्राकडे दाद

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झोपडपट्ट्यांमधील घरे अनधिकृत आहेत, असा ठपका ठेवून मतदारयादीतून हजारो नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या विरोधात काँग्रेस केंद्राकडे दाद मागणार आहे, अशी माहिती शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली. पुणे जिल्ह्यात पुणे, खडकी आणि देहूरोड या तीन ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. संरक्षण मंत्रालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेले सदस्य काम करीत असतात.

देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी 30 एप्रिलला मतदान होणार आहे. कॅन्टोन्मेंट अ‍ॅक्टमधील तरतुदीनुसार या भागातील निवडणुका होतात. या अ‍ॅक्टमध्ये केलेल्या बदलानुसार अनधिकृत बांधकाम, झोपडपट्टीतील मतदारांची नावे वगळली आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदारयादीतून अशाप्रकारे पाच हजार मतदारांची नावे वगळली गेली आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदारयादीतूनही याच प्रकारे 26 हजार नावे वगळली आहेत. याबाबत जाहीर प्रकटन आले असून, आम्ही हरकत आणि आक्षेप घेणार आहोत.

SCROLL FOR NEXT