मिसळ प्रेमींनो! या वीकएंडला दैनिक पुढारी आयोजित महामिसळ सीझन ४; नक्की भेट द्या Pudhari
पुणे

Mahamisal Festival: मिसळ प्रेमींनो! या वीकएंडला दैनिक पुढारी आयोजित महामिसळ सीझन ४; नक्की भेट द्या

महा मिसळ महोत्सव अनेक मिसळप्रेमी खवय्ये यांचे आणि पुण्याचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य बनला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mahamisal Festival: पुण्यातील समस्त मिसळ प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो पुढारी माध्यमसमूहाचा आगळा वेगळा महामिसळ सीझन ४ ,नाहटा लॉन्स,सिंहगड रोड येथे आयोजित केला आहे. या उपक्रमा पुणेकर मिसळ प्रेमी आणि स्टॉल व्यावसायिक यांच्याकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दैनिक पुढारी माध्यम समूहाच्या वतीने गेली तीन वर्षे हा महा मिसळ महोत्सव अनेक मिसळप्रेमी खवय्ये यांचे आणि पुण्याचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य बनला आहे.

पुण्याची पुणेरी मिसळ,कोल्हापूरची झणझणीत मिसळ,ठाण्याची चविष्ट मिसळ,नाशिक मधील लज्जतदार मिसळ अशा विविध प्रसिद्ध मिसळचे स्टॉल्स या महोत्सवात असल्याने मिसळ प्रेमींना, विशेषत: मॉर्निंग वॉक करणारे नागरिक यांच्यासाठी हे दोन दिवस आपला सकाळचा नाष्टा करण्यासाठी, वीकएंड ला हॉटेलिंग करणाऱ्या खवय्यांसाठी दुपारी,संध्याकाळी आपल्या परिवारासोबत झणझणीत, तर्रीबाज,चवदार मिसळचे अनेक वेगवेगळे प्रकार मनमुराद खाण्याची एक चांगली संधी असणार आहे.

यासोबत काही स्टॉल्सवर काही गोड पदार्थ,थंड ताक, आईस्क्रिम, चहा, कॉफी यांचाही आस्वाद घेता येईल.या महोत्सवामध्ये मिसळ व्यावसायिकांसाठी असणारे सर्व स्टॉल्स बुक झाले आहेत.या महोत्सवाचे वैशिष्य म्हणजे रविवारी २ मार्च,२५ रोजी सायंकाळी सोनी मराठी चॅनेलवरील प्रसिद्ध हास्यजत्रा कार्यक्रमाचे काही कलाकार भेट देणार आहेत.

यामुळे त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची ,ऐकण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.याबरोबरच या महोत्सवात सांस्कृतीक,संगीतमय कार्यक्रम सादर होणार असल्याने या महोत्सवास भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळ्या चविष्ट ,लज्जतदार आपल्या आवडत्या मिसळचा स्वाद घेत आपण या स्वरमधुर कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.

या मिसळ महोत्सवात प्रत्येकी फक्त वीस रुपये प्रवेश शुल्क आहे.तरी मिसळ प्रेमी पुणेकरांनी या शनिवारी व रविवारी या महा मिसळ महोत्सवास आपल्या परिवारासोबत अवश्य भेट द्यावी आणि विविध मिसळच्या चविष्ट डिशेसचा आनंद घ्यावा आणि यथायोग्य पेटपूजा करावी असे आवाहन दैनिक पुढारीच्या वतीने करण्यात येत आहे.

या महामिसळ महोत्सवास मुख्य प्रायोजक माणिकचंद ऑक्सिरिच, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप क्रेडिट सोसायटी, एज्युकेशन पार्टनर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस, इव्ही बाईक पार्टनर इझी राईड, डेअरी पार्टनर कात्रज डेअरी (पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) यांचे स्नॅक्स पार्टनर लक्ष्मीनारायण चिवडा, टी पार्टनर सोसायटी चहा या प्रायोजकांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे.

महामिसळ महोत्सव कधी व कुठे?

  • कधी: शनिवार 1 मार्च व रविवार 2 मार्च 2025

  • कुठे: नाहटा लॉन्स, वीर बाजी पासलकर चौक, वडगाव पुलाच्या सिग्नलच्या अलीकडे, सिंहगड रोड, पुणे.

  • वेळ: सकाळी 8.30 ते रात्री 10 पर्यंत.

  • प्रवेश फी: प्रतिव्यक्ती 20 रुपये

  • माहितीसाठी संपर्क: 9822441953

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT