पुणे

पुणे : हा तर दात टोकरून पोट भरण्याचा प्रकार: सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांचे प्रतिपादन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्राने बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करूनही बँकांकडून विविध सेवा पुरवल्याच्या नावाखाली होणारा सर्वसामान्यांचा आर्थिक छळ काही थांबताना दिसत नाही. बँकांकडून चेकबुक, एटीएमचा वापर आदी सेवेच्या मोबदल्यात ग्राहकांकडून पैसे कापले जात असून, हा प्रकार दात टोकरून पोट भरण्याचा प्रकार आहे, असे प्रतिपादन सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले. सजग नागरिक मंचच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'लोक हो सजग व्हा' या विषयावर रविवारी (दि.6) वेलणकर बोलत होते.

वेलणकर म्हणाले, 'कोरोनाचा फटका छोटे, मोठे व्यावसायिकासह सर्वांनाच बसला. मात्र, मेहरबान सरकारने अमाप नफा कमाविणार्‍या टोल कंपन्यांना टोलवसुली करण्यासाठी तीन ते चार महिने वाढवून देत नुकसानभरपाई दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सरकारी नोकराने भ्रष्टाचार केल्याबाबत तक्रार आल्यानंतर तपासासाठी संबंधित विभागाच्या प्रमुखांची परवानगी घ्यावी लागते मात्र, तक्रारी दाखल केल्यानंतरही वर्षानुवर्षे अनेक प्रकरणात चौकशीची परवानगी दिली जात नसल्याचे आढळून आले आहे

.' कायद्यात 2017 मध्ये बदल करीत 17 अ नुसार भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाली की, 120 दिवसांत वरिष्ठांनी चौकशीची परवानगी द्यावी अथवा नाकारावी असे नमूद केले आहे. मात्र, त्यानंतर काय करायचे, याची तरतूद करायचे विसरले आहेत. पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भातही 10 तक्रारींपैकी 9 प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT