पुणे

भारत गौरव यात्रेची तिसरी रेल्वे ‘अयोध्या’साठी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या 'देखो अपना देश' या उपक्रमांतर्गत असलेली भारत गौरव यात्रेची तिसरी रेल्वेगाडी पुण्यातून अयोध्येच्या दिशेने धावणार आहे. दिनांक 13 ते 20 जुलै 2023 असा या गाडीचा प्रवास असून, या गाडीला 'रामपथ' यात्रा असे नाव देण्यात आले आहे. या गाडीचे नियोजन आयआरसीटीसीकडून करण्यात आले आहे. भारत गौरवच्या पुण्यातून सुटणार्‍या तिसर्‍या रेल्वे गाडीसंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वेच्या आयआरसीटीसी कडून पुणे रेल्वे स्टेशन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी आयआरसीटीसीचे क्षेत्रीय अधिकारी जी.व्ही. सोन्ना, एक्झिक्युटिव्ह (पुणे) अलोक परमार, एक्झिक्युटिव्ह (मुंबई) श्वेता सिंग, योगेश मिश्रा व अन्य उपस्थित होते. भारत गौरव रेल्वेची पुण्यातून सुटणारी ही तिसरी गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून 13 तारखेला सुटल्यानंतर पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ येथून पर्यटक प्रवाशांना घेईल, त्यानंतर ती गाडी अयोध्या, वाराणसी, प्रयाग, चित्रकुट, जबलपूर या ठिकाणच्या पर्यटनस्थळांना भेट देईल, त्यानंतर ही गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने प्रवास करेल, असे परमार यांनी या वेळी सांगितले.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT