पुणे

पुणे : ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनासाठी समितीच नाही

अमृता चौगुले

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ कलावंत आणि साहित्यिक मानधन योजनेसाठी जिल्ह्यास्तरीय कलाकार मानधन निवड समिती असते. परंतु, अद्याप नवीन समितीच गठित करण्यात आलेली नाही. ही समिती पालकमंत्र्यांच्या अध्यतेखाली गठित करण्यात येते. याबाबत जिल्हा परिषदेकडून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र दिले असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्यात सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या कलाकारांची संख्या मोठी आहे.

यामुळे पुणे जिल्ह्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन समिती गठित झाल्यानंतर यावर विचार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 60 ज्येष्ठ कलावंतांना मानधन सुरू करण्यात येते. यासाठी ज्येष्ठ कलावंत मानधन योजना निवड समिती स्थापन करण्यात आली येणार आहे. ज्येष्ठ कलावंतांना अ, ब आणि क श्रेणीनुसार मानधन मिळते.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT