पुणे

Crime news : साखरपुड्याच्या कार्यक्रमातून दागिने अन् पैशांची चोरी

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत यशोदीप मंगल कार्यालयात झालेल्या साखरपुडा व टिळ्याच्या कार्यक्रमात अज्ञाताने दागिने व पैसे असलेली पर्स असा एकूण 3 लाख 4 हजार 882 रुपयांचा मुद्देमाल पळविला. ही घटना बुधवारी (दि. 3) सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत गणेश संभाजी खालकर (रा. जवळे, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील यशोदीप मंगल कार्यालय येथे खालकर व हिंगे कुटुंबीयांच्या मुला-मुलीचा साखरपुडा व टिळा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमासाठी फिर्यादी यांच्या पत्नीने पर्समध्ये दागिने व पैसे आणले होते. पाहुण्यांच्या गडबडीत त्यांनी पर्स शेजारील खुर्चीवर ठेवली असता अज्ञाताने ती पळविली. या पर्समध्ये 1 लाख 7 हजार रुपयांची रोख रक्कम, 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल, 38 हजार 44 रुपयांची सोन्याची अंगठी, 1 लाख 42 हजार 884 रुपयांची सोन्याची चेन, 1 हजार 900 रुपयांचे चांदीचे अंकलेट असा एकूण 3 लाख 4 हजार 882 रुपयांचा मुद्देमाल होता, तो सर्व चोरीला गेला. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार तान्हाजी हगवणे करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT