पुणे

पुणे : वृद्धेचे चोरीस गेलेले मंगळसूत्र परत मिळविण्यात ओतूर पोलिसांना यश

अमृता चौगुले

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सुमारे सात महिन्यांपूर्वी ओतूर (ता. जुन्नर) येथील बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना एका वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने चोरून पोबारा केला होता. दि. १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी ओतूर बसस्थानकात ओतूर ते नारायणगाव या बस मध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत बबाबाई गोविंद हिंगणे (रा. हिंगणे वस्ती, मु.पो. ब्राम्हणवाडा, ता. अकोले) यांचे १३ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र चोरीस गेले होते. ते ओतूर पोलिसांच्या अथक प्रयत्नाने पुन्हा ताब्यात मिळाल्याने परिसरात ओतूर पोलीसांबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

अलीकडच्या काळात ग्रामीण भागात मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी सर्व पोलीस स्टेशनला दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचे मार्गदर्शनात पोलीस नाईक जनार्दन सापटे, पोलीस हवालदार महेश पटारे, पोलीस नाईक भारत सूर्यवंशी, महिला पोलीस मोहिणी जाधव आदींनी या प्रकरणाचा छडा लावून वृद्धेला तिचे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT