पुणे

तळेगाव दाभाडे: महिलेच्या सतर्कतेमुळे टळला चोरीचा प्रसंग

अमृता चौगुले

तळेगाव दाभाडे, पुढारी वृत्तसेवा: घरातील कपाट फोडत असताना महिलेने चोरट्यांना घाबरून न जाता आरडाओरडा केल्यामुळे चोरांनी पळ काढला. त्यामुळे महिलेच्या सतर्कतेमुळे होणार्‍या चोरीचा प्रसंग टळला आहे. सोमवारी रात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान तळेगाव येथील कडोलकर कॉलनीतील 32 बंगल्या परिसरात राहणारे धनंजय वाडेकर यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्याने खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश केला. वाडेकर यांची आई दवाखान्यात अडमिट आहे.

त्यामुळे वाडेकर हे आईबरोबरच दवाखान्यामध्ये होते. घरामध्ये वाडेकर यांची मुलगी व पत्नी या दोघीच होत्या. रात्री तीनच्या दरम्यान चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश केला आणि घरामधील कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. त्याचा आवाज ऐकून वाडेकर यांच्या पत्नी जाग्या झाल्या.

प्रत्यक्ष त्यांनी चोरट्यांना पाहिले. त्याच क्षणी त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली व चोरट्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यांचे हे रूप पाहून चोरट्यांनी लगेच त्या ठिकाणावरून पळ काढला. या घटनेमध्ये वाडेकर यांच्या घरातील चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. परंतु, वाडेकर यांनी दाखवलेल्या धाडसाच्या परिसरामध्ये कौतूक होत आहे.

सर्तक राहण्याचे पोलिसांचे आवाहन

याच कालावधीमध्ये चोरट्याने रेकी करून त्या परिसरातील दोन-तीन बंद असलेल्या घरांच्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलिसांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT