पुणे

माळेगाव पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम ‘जैसे थे’

अमृता चौगुले

माळेगाव; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात नव्याने निर्माण झालेल्या माळेगाव नगरपंचायत परिसरातील पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, पायाभूत सुविधांमुळे या इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत राहिले आहे. परिणामी, जुन्या दूरक्षेत्राच्या इमारतीमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना काम करण्याची वेळ आली आहे. इतर सुविधांकरिता निधीची आवश्यक आहे.

माळेगाव जुन्या पोलिस चौकीच्या असणार्‍या दोन एकर जागेवर नव्या पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली करण्यात आले. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या इमारतीमध्ये प्रभारी अधिकारी कार्यालय, सहायक पोलिस उपनिरीक्षक कार्यालय, तक्रार निवारण कार्यालय, आरोपींकरिता कोठडी रूम, वायरलेस रूम आदी कामांचा समावेश आहे. त्यानुसार या सुसज्ज इमारतीचे काम सुरू करण्यात आले असून, इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

असे असले तरी, अजून फर्निचर, सुशोभीकरण व इतर पायाभूत सुविधांची कामे निधीअभावी रखडलेली आहे. त्यामुळे गेले अनेक महिन्यांपासून या पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम 'जैसे थे' आहे. दरम्यान, पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची गैरसोय दूर होण्यासाठी या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण काम व्हावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT