दौंड; पुढारी वृत्तसेवा : दौंड रेल्वे यार्डात अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी (दि. 5) सायंकाळी मालवाहतूक करणार्या मालगाडीचे शेटिंग सुरू असताना एका मालडब्याचे चाक रुळावरून खाली उतरले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मोठी धावाधाव झाली.
दोन दिवसांपूर्वीच याच यार्डात एका प्रवासी बोगीने पेट घेतला होता. या घटनेला दोन दिवस उलटले नसताना आता आणखी एक अपघात झाला. त्यामुळे रेल्वेच्या कामकाजाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.