पुणे: राज्यात सुरू असलेला वळिवाच्या पावसाचा कहर 30 मेपर्यंत कायम राहणार आहे. दरम्यान येत्या चोवीस तासांत कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार, पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात मुसळधार तर विदर्भातही वादळीवारे, मेघगर्जना, विजांचा कड्कडाटात पाऊस कायम राहणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.
राज्याच्या सर्वच भागात मागील आठ दिवसांपासून मध्यम ते मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या मध्य पूर्व अरबी समुद्र आणि दक्षिण कोकणच्या किनारपट्टीपर्यत तीव्र कमी दाबाचा पट्टा असून तो हळूहळू उत्त्तर पूर्व रत्नागिरीपासून 30 किमी तर दापोलीपासून 70 किमी अंतरावर आहे. (Latest Pune News)
तसेच दक्षिण कोकण किनारपट्टी रत्नागिरी, दापोली या भागापर्यत पोहचणार आहे. याशिवाय मध्यपूर्व अरबी समुद्र ते दक्षिण छत्तीसगडपर्यत द्रोणीय स्थिती आहे. या दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. पश्चिम राजस्थान ते पश्चिम विदर्भापर्यत द्रोणीय स्थिती आहे. य सर्व स्थितीमुळे राज्यात वळिवाचा पाऊस कार्यरत आहे.
यलो अलर्ट: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम. ऑरेज अलर्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.