राज्यस्तरीय कुस्ती Pudhari
पुणे

पुण्यात रंगणार राज्यस्तरीय कुस्तीचा थरार

दि. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान जंगी आखाडा; हिंदू गर्जना प्रतिष्ठान व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुढारी वृत्तसेवा

पुणे : हिंदू गर्जना प्रतिष्ठान व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने 'हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज घाटे, हिंद केसरी योगेश दोडके आणि तात्यासाहेब भिंताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत खुला गट हा राज्यस्तरीय पुरुष आणि महिला असा असणार असून इतर गट पुणे शहर आणि जिल्हा अशा स्वरूपाचा असणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी तब्बल ४५ लाखांची बक्षिसे असून खुल्या गटातील पुरुष विजेत्याला महिंद्रा थार, चांदीची गदा आणि २ लाख ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाला १ लाख ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह आणि तृतीय क्रमांकाला १ लाख ५१ हजार असे बक्षीस देण्यात येणार आहे. तर खुल्यातील गटातील महिला विजेत्याला २ लाख ५१ हजार ई- बाईक आणि चांदीची गदा, द्वितीय क्रमाकांच्या विजेत्याला चषक आणि १ लाख ५१ हजार आणि तृतीय क्रमांक विजेत्याला चषक आणि १ लाख असे बक्षिसाचे स्वरूप आहे.

कुमार गटातील कुस्ती स्पर्धा पुणे शहर आणि जिल्ह्यातील पैलवानांसाठी असणार आहे. त्यामधील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला चांदीची गदा आणि १ लाख, द्वितीय क्रमांक विजेत्याला ५० हजार आणि चषक आणि तृतीय क्रमांक विजेत्याला २५ हजार आणि चषक अशा स्वरूपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी दि.७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अजित पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता भरणे हे उपस्थित राहणार आहेत तर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार बाहे. तर इराणचे मल्ल मिर्झा आणि आली यांचा प्रेक्षणीय सामना होणार आहे. स्पर्धेसाठी स. प. महाविद्यालयात मातीचे दोन स्वतंत्र आखाडे असणार असून जवळपास १० हजार प्रेक्षकांची बसण्याची सोय असणार आहे. या स्पर्धेतून दोन पुरुष आणि एक महिला मल्ल याना एक वर्षासाठी दत्तक घेण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT