मी गोल्ड मेडल मिळवणार, मी ट्रॉफी जिंकणार..मी राष्ट्रीय स्तरावर खेळणार....अशी महत्वाकांक्षा असणाऱ्या मुलींसाठी पुण्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडाविश्वात फक्त दोन वर्षांच्या कालावधीत प्रसिध्द झालेला फक्त महिलांसाठी प्रसिध्द असलेला पुढारी राईज अप ॲथलेटिक्सचा तिसरा सीझन १७ डिसेंबर पासून सुरू होत आहे.
पुणे जिल्ह्यातील ॲथलेटिक्स प्रेमी, मुली, पालक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तीच ही ॲथलेटिक्स स्पर्धा..मंगळवार १७ ते गुरुवार १९ डिसेंबर २४ असे तीन दिवस पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने ९ वर्षे, ११ वर्षे, १३ वर्षे, १५ वर्षे, १७ वर्षे अशा पाच वयोगटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण धावणे,लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, अडथळा शर्यत अशा प्रकारात एकूण वैयक्तिक ३३ व ५ सांघिक प्रकारच्या स्पर्धा पार पडतील.
विशेष बाब म्हणजे या स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असून आत्तापर्यंत या स्पर्धेसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड,पुणे जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणावर आपला प्रवेश नोंदवला आहे. अजूनही ज्यांनी प्रवेश नोंदवला नसेल त्यांनी त्वरित आपला प्रवेश नोंदवावा असे आवाहन पुढारीच्या वतीने सर्व पालक, शिक्षक, प्रशिक्षक, स्पर्धक यांना करण्यात आले आहे. रविवार दिनांक १५ डिसेंबर पर्यंत प्रवेश नोंदवता येईल.
राष्ट्रीय खेळाडू ललिता बाबर यांनी पुढारीच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन केले आहे.या स्पर्धेमधील यशस्वी स्पर्धकांना रोख अडीच लाख रुपये,मेडल्स, ट्रॉफीज अशी भरघोस बक्षीसे आहेतच पण याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देखील मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सीरीच , स्किन केअर पार्टनर रुपमंत्रा स्किन तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप् क्रेडिट सोसायटी, सपोर्टींग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे गिफ्ट पार्टनर तन्वी हर्बल यांच्या सहकार्याने या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना विशेष गिफ्टस दिली जाणार आहेत.
अशा स्पर्धेमधून भविष्यातील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत व त्यांची कारकीर्द यशस्वी व्हावी हाच पुढारी माध्यम समूहाचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा क्रीडाधिकारी पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना, पुणे गर्ल्स असोसिएशन, पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना, पुणे महानगरपालिका क्रीडा विभाग, पिंपरी चिंचवड क्रीडा शिक्षक संघटना यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.