राज्याच्या सर्वच भागांतून मान्सून परतला तरी दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस मागील काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावीत होता. आता मात्र, राज्यातील पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आता सर्वच भागांत कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्याच्या सर्वच भागांत मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने बहुतांश भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. आता मात्र अवकाळी पाऊस थांबला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्वच भागांत हवामान कोरडे राहील आणि हळूहळू थंडी वाढत जाण्याची शक्यता आहे. अर्थात अजूनही मराठवाडा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस सुरू आहे.