वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी रंगणार दिल्लीतील साहित्य संमेलन File Photo
पुणे

वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी रंगणार दिल्लीतील साहित्य संमेलन

तालकटोरा स्टेडियममध्ये 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान आयोजन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिल्लीत होणार्‍या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अखेर जाहीर झाली असून, ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी कट्टा, मुलाखती अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी साहित्य संमेलन रंगणार आहे.

अभिजात मराठी भाषेचा जागरही संमेलनात होणार आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान आयोजित या साहित्य संमेलनात दिग्गज साहित्यिकांसह नवोदित लेखकही संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

शुक्रवारी (दि.21) दुपारी 3.30 वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर उपस्थित राहणार आहेत.

साहित्य संमेलनाला अवघे काही दिवस असल्यामुळे संमेलनाची कार्यक्रम पत्रिका कधी जाहीर होणार, असा सवाल साहित्यिक आणि साहित्यप्रेमींकडून विचारला जात होता. अखेर संमेलनाची कार्यक्रम पत्रिका गुरुवारी (दि.13) जाहीर करण्यात आली.

मराठी साहित्य आणि मराठी भाषेचा जागर करणारे अनेक परिसंवाद, मान्यवरांच्या मुलाखती, कविसंमेलन असे विविध कार्यक्रम संमेलनात आयोजित करण्यात आले आहेत. संमेलनास्थळी महात्मा जोतिराव फुले सभा मंडप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप, यशवंतराव चव्हाण सभा मंडपात संमेलनातील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

संमेलनाचा समारोप रविवारी (दि.23) सायंकाळी साडेचार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडपामध्ये होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील या वेळी उपस्थित राहणार आहेत. संमेलनाविषयी साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता असून, संमेलनाचे कार्यक्रम जाहीर झाल्याने आता साहित्यप्रेमींना त्यानुसार नियोजन करता येणार आहे.

संमेलनात शुक्रवारी (दि.21) होणारे कार्यक्रम -डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप

  • ग्रंथ दिंडी प्रारंभ (सकाळी 9.30)

  • उद्घाटन सत्र दुसरे (सायंकाळी 6.30) - उपस्थिती - सुशीलकुमार शिंदे, उदय सामंत, अ‍ॅड. आशिष शेलार, पूर्वाध्यक्ष भाषण - डॉ. रवींद्र शोभणे - अध्यक्षीय भाषण - डॉ. तारा भवाळकर.

  • निमंत्रितांचे कविसंमेलन - अध्यक्ष - इंद्रजित भालेराव (सायंकाळी 7.30)

संमेलनात शनिवारी (दि.22) होणारे कार्यक्रम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप)

  • मुलाखत - मराठी पाऊल पडते पुढे (सकाळी 10)

  • परिसंवाद - विषय - मनमोकळा संवाद - मराठीचा अमराठी संसार (दुपारी 12)

  • विशेष सत्कार - संजीवनी खेर, दत्तात्रय पाष्टे, कमल पाष्टे - हस्ते - उषा तांबे (दुपारी 2)

  • लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी कार्यक्रम (दुपारी 2.30)

  • परिसंवाद - विषय - राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब (सायंकाळी 4)

  • मधुरव कार्यक्रम (सायंकाळी 6)

संमेलनात शनिवारी (दि.22) होणारे कार्यक्रम (यशवंतराव चव्हाण सभा मंडप)

  • बहुभाषक कविसंमेलन (दुपारी 12.30)

  • परिचर्चा - आनंदी गोपाळ (दुपारी 2.30)

  • परिसंवाद - विषय - बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन आणि साहित्य (सायंकाळी 4)

संमेलनात रविवारी (दि.23) होणारे कार्यक्रम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप)

  • असे घडलो आम्ही कार्यक्रम (सकाळी 10)

  • परिसंवाद - विषय - सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य (दुपारी 12)

  • परिसंवाद - विषय - नाते दिल्लीशी मराठीचे (दुपारी 2.30)

संमेलनात रविवारी (दि.23) होणारे कार्यक्रम (यशवंतराव चव्हाण सभा मंडप)

  • परिसंवाद - विषय - अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषांतून मराठीत (सकाळी 10)

  • परिसंवाद - विषय - कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता (दुपारी 12)

विविध कार्यक्रम रंगणार

महात्मा जोतिराव फुले सभा मंडपातही विविध कार्यक्रम रंगणार आहेत. शनिवारी (दि. 22) कवी कट्टा सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 यावेळेत आयोजित केला आहे. तर रविवारी (दि.23) कवी कट्टा सकाळी 9.30 ते दुपारी 1 आणि दुपारी 1 ते 2 या वेळेत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT