पुण्यातील वजनदार महिला नेतृत्व, माधुरी मिसाळ यांचा राजकीय प्रवास File Photo
पुणे

पुण्यातील वजनदार महिला नेतृत्व, माधुरी मिसाळ यांचा राजकीय प्रवास

पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील आज शपथ घेतली.

Shivani Badadhe

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सर्वांचंच लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. अखेर आज महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यात पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील आज शपथ घेतली.

माधुरी मिसाळ सलग चौथ्यांदा आमदार झाल्या आहेत. माधुरी मिसाळ या पक्ष वाढवण्यासाठी २० वर्षांपासून काम करत आहेत. नगरसेविका ते आमदार आणि आता मंत्री म्हणून माधुरी मिसाळ काम करणार आहेत.

माधुरी मिसाळ २००७ मध्ये पहिल्यांदा कसबा मतदारसंघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना पर्वती मतदारसंघात आमदारकीचं तिकीट मिळाले. तेव्हापासून त्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार म्हणून काम करत आहेत. २००९ ते २०२४ अशी सलग चार वर्षे त्या या मतरसंघातून निवडून आल्या आहेत.

राजकीय कारकीर्द-

  • विधानसभा सदस्य (आमदार), पर्वती मतदारसंघ, पुणे

  • कार्यकाळ: 2009, 2014, 2019 आणि 2024 सलग. सलग चौथ्या टर्मसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला.

  • पुणे महापालिकेत 22 भाजप नगरसेवक निवडून आणले, त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता येण्यास मदत झाली, त्याच भागातील मागील 3 भाजप नगरसेवकांपेक्षा ऐतिहासिक वाढ

कोण कोणती कामं केली?

  • स्वारगेट येथील मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब

  • (ESIC) 500 खाटांचे रुग्णालय

  • स्थानिक कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी

  • कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम.

  • स्वारगेट ते कात्रज मेट्रो,

  • खडकवासला ते खराडी मेट्रो

  • सिंहगड रोड उड्डाणपूल

  • गंगाधाम फ्लायओव्हर

  • स्वारगेट उड्डाणपूल

  • तळजाई वन नियोजन

  • पर्वती टेकडी संवर्धन आणि वारसा नियोजन

  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी चळवळ सुरू करणे.

इतर राजकीय भूमिका

  • सचिव, महाराष्ट्र प्रदेश भाजप

  • सदस्य, लोकलेखा समिती, महाराष्ट्र

  • पुणे शहर भाजप अध्यक्ष

  • माजी सदस्य, पुणे महानगरपालिका

  • विधानसभा प्रतोद

भूषवलेली पदे

  • संचालिका, तीर्थ रिअल इस्टेट (शहरी विकास, बांधकाम आणि पायाभूत सुविधा)

  • अध्यक्षा, सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट (शिक्षण)

  • संचालिका, उद्यम को-ऑप बँक लिमिटेड (बँकिंग)

  • अध्यक्षा, सतीश मिसाळ फाउंडेशन (चॅरिटी) (सामाजिक कार्य)

  • माजी अध्यक्षा,विद्या को-ऑप बँक लि. (बँकिंग)

  • माजी विश्वस्त, शिक्षण प्रसारक मंडळी (शिक्षण)

  • 1989 पासून संचालक आणि अध्यक्ष म्हणून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • 22 वर्षांपासून पायाभूत सुविधा विकास आणि बांधकाम क्षेत्रात काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT