मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची विरोधकांवर टिका Pudhari News Network
पुणे

प्रभू रामाच्या नावावरुन विरोधकांनी राजकारण केले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रभू रामचंद्र आणि आयोध्या आपल्या अस्मिता आणि श्रद्धेचा विषय आहे. मात्र, काही लोकांनी त्याचे राजकारण केले आहे, अशा लोकांना येणाऱ्या निवडूकीत धडा शिकवायचा आहे. लोकसभेला ज्या पद्धतीने गाफिल राहिलो तसे विधानसभेला राहू नका. जागृत रहा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हडपसर येथील हांडेवाडीतील श्रीराम चौकात प्रभू श्रीरामाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नाना भानगिरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार योगेश टिळेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

विरोधकांना धडा शिकवा.

शिंदे पुढे म्हणाले, भर पावसात लोकार्पण झालें आहे. आयोध्या मध्ये राम मंदिर व्हावे अशी राम भक्तांचे स्वप्न होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते म्हणायचे मला एकदिवस पंतप्रधान करा मी रामाचे आयोध्या येथे मंदिर उभारतो आणि काश्मीर मधील 370 कलम सुद्धा हटवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर हि तयार केले आणि ग्रहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम हटवून टाकले. विरोधक मंदिर यही बनायेंगे लेकिन तारीख नहीं बतायेंगे अशी खिल्ली उडवत होते. पण आता मंदिर पण झालें आहे. रामाच्या हातात धनुष्य होते हे धनुष्य आता आपल्याकडे आले आहे. जो नहीं राम का ओ नहीं काम का... असे म्हणतं विरोधकांना धडा शिकवा.

आज बालेवाडी येथे माझी लाडकी बहीण योजना आज खऱ्या अर्थाने सुरवात झाली. तब्बल 1 कोटी 4 लाख बहिनींच्या खात्यात रक्षाबंधन पूर्वी पैसे जमा झाल्याचे समाधान आहे. ज्यांचे जमा झालें नाहीं त्यांचे हि जमा होतील. लाडक्या भावांसाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सहा, आठ आणि दहा हजार सुशिक्षित बेरोजगारांसाठी देत आहोत. ज्येष्ठा सांठी हि डिबीटी द्वारे थेट तीन हजार रुपये आणि मुख्यमंत्री देवदर्शन योजना आणली आहे. या सर्व योजना पुढे हि सुरूच राहतील, असे हि शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नाना भानगिरे यांनी हि मनोगत व्यक्त केले.

अन् मुख्यमंत्र्यांनी घोषणा टाळली

हडपसर विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीराम चौकात प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पनाच्या निमित्ताने नाना भानगिरे यांच्या आमदारकीची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. तसे कार्यकर्त्याने मुख्यमंत्री यांना विनंती केली. परंतु मुख्यमंत्री यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत घोषणा करण्याचे टाळले.

नानाची कीर्ती मात्र मोठी...

नाना तसा छोटासा दिसतो पण काम मात्र मोठा करतो. त्याची मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. नाना छोटी कामे करत नसतो तो मोठीच कामे करतो. कोणत्याही सामाजिक कार्यासाठी नेहमी पुढेच असतो, त्यांची सेवा करत असतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT