पुणे

पुणे : फेरमूल्यांकनात पालिकेचे वाचले 55 कोटी रुपये

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुलटेकडी (सॅलिसबरी पार्क) येथील उद्यानासाठी आरक्षित जागेचे फेरमूल्यांकन केल्यानंतर महापालिकेचे 55 कोटी रुपये वाचल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या फेरमूल्यांकनानुसार पावणेसतरा कोटी रुपये इतकी नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

सॅलिसबरी पार्क टी. पी. स्कीममधील भूखंड क्र. 438, प्लॉट नं. 1, 2, 3, 8 आणि 9 असे एकूण 7295.00 चौ. मी. क्षेत्रफळ जागेवर उद्यानाचे आरक्षण आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने जानेवारी 2009 मध्ये प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी विशेष भूमिसंपादन अधिकार्‍यांनी डिसेंबर 2014 मध्ये निवाडा जाहीर करून भूसंपादन केले होते. जागामालकास नुकसानभरपाईपोटी 71 कोटी 55 लाख रुपये निर्धारित केले होते. ही रक्कम अवाजवी असल्याने या निवाड्याविरुद्ध महापालिकेने 2015 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

महापालिकेस वाजवी वाटत असलेली रक्कम व्याजासह सुमारे 18 कोटी 83 लाख रुपये जागामालकांना दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने 2019 मध्ये अंतिम निकाल देताना विशेष भूसंपादन अधिकार्‍यांनी दिलेला निवाडा कायम ठेवला होता. त्या निर्णयाविरुद्ध महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना फेरमूल्त्यानुसार नुकसानभरपाई मोबदल्याची एकूण 16 कोटी 77 लाख 78 हजार 604 रुपये इतकी रक्कम निर्धारित केली आहे. त्यामुळे महापालिकेची 54 कोटी 77 लाख 59 हजार 753 रुपये बचत झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT