पुणे : पुढारी वृत्तसेवा : रॅली आत्मविश्वासाची… रॅली आत्मनिर्भरतेची अन् रॅली आत्मसन्मानाची… महिला सक्षमीकरणाचा संदेश देणार्या
अन् महिलांच्या शक्तीचा जागर करणार्या दै. 'पुढारी' आणि 'पुढारी कस्तुरी क्लब'तर्फे महिलांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. खास गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नववर्षानिमित्त डाबर ग्लुकोप्लस सी प्रस्तुत ही महिला भव्य बाईक रॅली रविवारी (दि. 26) आयोजित केली असून, याद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात येणार आहे. ही बाईक रॅली सकाळी आठ वाजता सारसबागे जवळील मित्रमंडळ चौक येथील दै. 'पुढारी' कार्यालय येथून निघणार आहे.
'पुढारी कस्तुरी क्लब'च्या वतीने महिलांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ही खास बाईक रॅली. या रॅलीत शेकडो महिला सहभागी होणार असून, त्यातून स्त्रीशक्तीचा नारा बुलंद होणार आहे. ढोल-ताशा, लेझीम आणि दांडपट्टा पथकांचे सादरीकरण, हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या रॅलीचे ज्वेलरी पार्टनर 'सेन्को गोल्ड अँड डायमंड्स' असून, एंटरटेन्मेंट पार्टनर 'कलर्स मराठी' हे आहेत. या रॅलीत 'कस्तुरी' सदस्यांसह इतर महिलांनाही सहभागी होता येणार आहे. या रॅलीसाठी महिलांना प्रवेश विनामूल्य आहे. बाईक रॅलीत सहभागी होणार्या प्रत्येकीला प्रशस्तिपत्र आणि 'सेन्को गोल्ड'कडून आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहेत.
'कलर्स मराठी'वरील कलाकारांची बाईक रॅलीत असणार उपस्थिती…
– 'कलर्स मराठी'वरील 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेतील मुख्य नायक अर्जुनची भूमिका करणारे इंद्रनील कामत, मुख्य नायिका सावीची भूमिका करणार्या रसिका वाखारकर हे बाईक रॅलीत सहभागी होणार असून, त्यांची उपस्थिती रॅलीचे आकर्षण असणार आहे.
'जीव माझा गुंतला' या मालिकेतील चित्राची भूमिका साकारणार्या प्रतीक्षा मुणगेकर यांच्यासह 'बिग बॉस मराठी'तील सीझन कंटेस्टंट अमृता धोंगडे याही रॅलीत सहभागी होतील अन् स्त्रीसक्षमीकरणाचा नारा बुलंद करतील.