File Photo
पुणे

थकबाकीदारांची यादी हाउसिंग सोसायट्यांकडे सोपविणार

३६ हजार ९८० जणांकडे ६९ कोटी ५६ लाख रुपयांची थकबाकी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या शहरातील एकूण ६९० हाउसिंग सोसायट्यांमधील ५६ हजार २३२ सदनिकाधारकांना मालमत्ताकराचे बिल देण्यात आले आहेत. त्यामधून ६५१ सोसायटींमधील ३६ हजार ९८० मालमत्ताधारकांचा ६९ कोटी ५६ लाख रुपयांचा कर थकीत आहे. या थकबाकीदारांची यादी सोसायटीच्या अध्यक्षांकडे देण्यात येणार आहे. थकबाकीदारांनी बिलाचा भरणा करून कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सर्वेक्षणात आत्तापर्यंत ६४ हजार २६० नोंद नसलेल्या मालमत्ताधारकांना बिलाचे वाटप करण्यात आले आहे. थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना एसएमएस, टेलिकॉलिंग या माध्यमातून कराचा भरणा करण्याचे आवाहन केले जात आहे. थकबाकी असणाऱ्या ६५१ हाउसिंग सोसायटीचे अध्यक्षांना त्यांच्या सोसायटीमधील थकबाकी सदनिकाधारकांची संपूर्ण माहिती कर संकलन विभागाकडून पाठविण्यात येणार आहे. थकबाकीदारांची नावाची यादी सोसायटीच्या नोटीस बोर्ड, सोसायटी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठविली जाणार आहे. सोसायटीच्या सभासदांना कराचा भरणा करण्यासाठी आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT