पुणे

सिंहगडचा ‘कल्याण दरवाजा’ ठरला लक्षवेधी

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात शिवजयंती शुक्रवारी (दि.10) साजरी झाली. याप्रसंगी शहरातून काढलेल्या मिरवणुकीत सिंहगडचा 'कल्याण दरवाजा' हा चित्ररथ देखावा लक्षवेधी ठरला. सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण गावातील हिंदवी स्वराज्याचे शिलेदार सरदार भिकाजी बिन सूर्याजी डिंबळे पाटील यांच्या आठवणींना त्यांचे वंशज बारामती शहर भाजपचे सरचिटणीस प्रमोद डिंबळे पाटील, पूजा डिंबळे पाटील व समस्त डिंबळे पाटील परिवाराने उजाळा दिला.

सरदार डिंबळे सरपाटील प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने 20 फूट उंच व 16 फूट रुंद असा देखावा उभारला होता. प्रसाद व प्रफुल्ल डिंबळेपाटील यांनी देखाव्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी मावळे व त्यांनी केलेले लाठी-काठी, ढाल पट्टा प्रात्यक्षिक व महिलांची फुगडी लक्षवेधी ठरली. नंतर देखावा शिवजयंती मिरवणुकीतही दाखल केला होता.

SCROLL FOR NEXT