हवामान  pudhari
पुणे

Weather Update : ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला ; तर काही ठिकाणी पडणार हलका पाऊस

पुढारी वृत्तसेवा

राज्यात आठवडाभर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणीच पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, विदर्भात 6 ऑक्टोबरला काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, तसेच वादळी वार्‍यासह पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, राज्यात पाऊस कमी होऊन ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे कमाल तापमानात 6 ते 7 अंश सेल्सिअसनी वाढ झाली आहे. त्यामुळे अगदी मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्यासारखे ऊन तापत आहे, त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.

मान्सून दोन दिवसांत निरोप घेणार

देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रामधून मान्सून माघारी परतणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनने मागील काही दिवसांपासून राजस्थानच्या पश्चिम भागातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. महाराष्ट्रामधून मान्सून परतीचा प्रवास करण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT