पुणे

पुणे : ‘पीएमआरडीए’ डीपीवरील सुनावणी आज संपणार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमआरडीएने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावरील हरकती-सूचनांची सुनावणी आज संपणार आहे. त्यानंतर संस्थात्मक आणि लोकप्रतिनिधींच्या हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पीएमआरडीएने ऑगस्ट 2021 मध्ये प्रारूप विकास आराखडा जाहीर केला, त्यात पुणे जिल्ह्यातील 814 गावांचा समावेश आहे. आराखड्यावर 67 हजार हरकती दाखल झाल्या होत्या.

दोन टप्प्यातील सुनावणी पूर्ण झाली असून, संस्थात्मक सुनावणी पूर्ण झाल्यानंतर समिती आपल्या अभिप्रायसह पीएमआरडीएला विकास आराखडा सादर करेल. त्यानंतर तो आराखडा अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर केला जाईल.
                                                                      – राहुल महिवाल,
                                                                   आयुक्त पीएमआरडीए

SCROLL FOR NEXT