पुणे

तरुणीची आत्महत्या : डोळ्यावर स्कार्फ बांधून तिने मारली इमारतीवरून उडी

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : डोळ्यावर स्कार्फ बांधून एका उच्चशिक्षित तरुणीने चार मजली इमारतीच्या छतावरून उडी मारली. वाकड येथे सोमवारी (दि. २०) सकाळी सातच्या सुमारास ही धक्कादाक घटना घडली. तरुणीच्या आत्महत्याचे ( आत्महत्या ) नेमके कारण समजू शकले नाही.

नम्रता गोकुळ वसईकर (२४, रा. नंदनवन कॅालनी, माऊली चौक, वाकड, मूळ रा. दराणे रोहले, ता. शिंदखेडा, जि. धुळे), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नम्रताचे 'बीटेक' (आयटी) पर्यंत शिक्षण झाले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास ती घरातून बाहेर निघाली. माऊली चौकातील एका चारमजली इमारतीच्या छतावर गेली. तेथे चेहरा आणि डोळ्यांवर स्कार्फ बांधून इमारतीच्या छतावरून तिने उडली मारली. यात तिच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, नम्रता घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला. सायंकाळी उशिरा ते वाकड पोलीस ठाण्यात गेले. मयत नम्रताचा फोटो पोलिसांना दाखविला. त्यांतनर नम्रताने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले.

वसईकर कुटुंबीय मुळचे धुळे येथील आहे. नम्रताच्या भावाला नोकरी लागल्याने ते सहा महिन्यांपूर्वी वाकड येथे आले होते. नम्रताची आई गृहिणी असून वडील बूट पॉालीश करण्याचे काम करतात. उच्चशिक्षित असलेल्या नम्रताने घेतलेल्या या निर्णयामुळे नातेवाईकांना धक्का बसला आहे. तपास वाकड पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT