पुणे

पुणे : खराडीतील पाणीपुरवठ्याचा प्रयोग फसला

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खराडी चंदननगरमधील काही भागात सुरू केलेला दिवसाआड पाणीपुरवठ्याचा महापालिकेचा प्रयोग फसला आहे. यामुळे या परिसरात आता शहरातील इतर भागांप्रमाणे दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेकडून 18 मे पासून आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणी बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, या पाणी बंद नंतर शहरातील काही भागात पुढे दोन ते तीन दिवस पाणी अतिशय कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी महापालिकेला आल्या.

प्रभाग क्रमांक 4, खराडीमधील काही भागात अशाच प्रकारे अपुर्‍या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने खराडीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. 10 जूनपासून खराडीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, आजारापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार होऊन या भागात पाणीपुरवठा आणखीनच विस्कळीत झाला. यामुळे पालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागल्याने अखेर दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मागे घेण्यात आला असून, आता या परिसरात शहरातील इतर भागांप्रमाणेच फक्त दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

वडगावशेरी, लोहगाव, विमाननगरचा पाणीपुरवठा आज सुरू राहणार

भामा आसखेड प्रकल्पाच्या जलवाहिनीतून होणार्‍या गळतीमुळे शहराच्या पूर्वभागातील नागरिकांचे पाण्याविना हाल झाले आहेत. त्यामुळे भामाआसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणार्‍या वडगावशेरी, लोहगाव, विमाननगर भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 22) सुरू राहणार आहे. शहराच्या पूर्वभागातील पाणीपुरवठ्यासाठी केलेल्या भामा आसखेड प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्यात वर्षभरात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. परिसरातील नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यातच भामा आसखेडच्या परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे.

भामा आसखेडच्या लाइनवर सातत्याने गळती होत आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ जात आहे. तोपर्यंत नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे शुक्रवारी पूर्ण दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे गुरुवारी (दि. 22) पुणे शहरात होणारा पाणीकपातीचा निर्णय भामा आसखेड परिसरात लागू नये, अशी मागणी पालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह अनेक नागरिकांनी केली होती. गुरुवारी वडगाव शेरी, लोहगाव, विमाननगर भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी सुरू राहणार आहे, असे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT