पुणे

सावरगाव येथील बंधारा कोरडाठाक; पिके करपू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : या बंधाऱ्यात तत्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. मारुती ढमढेरे यांनी केली आहे. मीना नदीवर असलेल्या सावरगाव येथील बंधारा सध्या पूर्णपणे कोरडा पडला आहे. यामुळे आजूबाजूच्या शेतकर्‍यांची पिके होरपळू लागली आहेत. काही शेतकर्‍यांनी नव्याने टोमॅटोची लागवड केली आहे. त्यांनादेखील पाणी देण्याची गरज आहे. त्याचबरोबर फुलशेती देखील सुकू लागली आहे.

उन्हाळी बाजरीला देखील पाण्याअभावी मोठ्या तडाखा बसत आहे. त्यामुळे वडस धरणामधून या बंधार्‍यामध्ये तत्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांची आहे. दोन दिवसांमध्ये या बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी सावरगाव बस्ती परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधन्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन न लागल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
दरम्यान, सावरगाव बस्ती परिसरातील शेतकर्‍यांनी आमदार अतुल बेनके यांनादेखील या बंधार्‍यात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार या बंधार्‍यात पाणी सोडण्याच्या सूचना आ. अतुल बेनके यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

अन्य जलस्रोत आटले

बंधार्‍यात पाणी नसल्यामुळे अन्य जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. कूपनलिकांना देखील पाणी नसल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. वडज धरणामधून मीना नदीवरील सावरगावच्या बंधार्‍यामध्ये तत्काळ पाणी सोडण्याची गरज आहे. यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच पिकांना तीन दिवसानंतर पुन्हा पाणी द्यावे लागत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT