मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील इनामगावच्या जागतिक कीर्तीच्या उत्खनन, संशोधन ठिकाणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी शासनाच्या एकछत्र योजनेतून 6 कोटी 39 लक्ष 50 हजार 578 रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. गेले अनेक दिवसांपासून इनामगावातील ग्रामस्थ व खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार स्वर्गीय बाबूराव पाचर्णे, महसूल पशुसंवर्धन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी सिद्धेश्वर मोकाशी, पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वहाणे, डेक्कन कॉलेजचे संचालक डॉ. वसंत शिंदे, सरपंच अनुराधा घाडगे, माजी सरपंच पल्लवी घाडगे, चेतन मचाले, शिवाजी मचाले यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, इनामगावच्या या जागतिक कीर्तीच्या संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन होणार आहे.