पुणे

ग्लिरिसीडियावरील ‘कुर्‍हाड’देशी वृक्षांच्या मुळावर

अमृता चौगुले

सुनील जगताप : 

पुणे : आक्रमक आणि स्थानिक वनसंपदेला धोका निर्माण करणार्‍या ग्लिरिसीडिया या परदेशी वृक्षांची तोड करण्याचे काम ठेकेदाराला दिले खरे, पण त्याने या परदेशी वृक्षांबरोबरच मौल्यवान अशा देशी वृक्षसंपदेवरही कुर्‍हाड चालवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील तळजाई वनविहारात घडला आहे. शेकडो देशी वृक्षांची ही तोड होत असताना त्यावर देखरेख ठेवण्यासाठी वनविभागाचा एकही कर्मचारी नसल्याचे दै. 'पुढारी'च्या पाहणीतून आढळून आले आहे.

शहराचे फुफ्फुस असलेल्या टेकड्यावरील वनसंपदा टिकवून ठेवण्याऐवजी वन विभागाच्या दुर्लक्षामुळे देशी वृक्षांची तोड होत असल्याची बाब पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यांनी 'पुढारी'शी संपर्क साधल्यानंतर या प्रतिनिधीने तळजाई टेकडीची पाहणी केली असता हा प्रकार समोर आला. तळजाई टेकडीवर वनविभागाने 1980 च्या दशकात वनीकरणाला सुरुवात केली. त्यात वेगवेगळे भाग पाडून रोपांची लागवड केली. एकूण सातशे एकर जागेवर हे वनीकरण करण्यात आले. मात्र, वनीकरणाचे परिणाम लवकर दिसावेत, या घाईने भराभरा वाढणार्‍या परदेशी वृक्षांची निवड करण्यात आली. त्यात ग्लिरिसीडिया या परदेशी वृक्षाचा प्रामुख्याने समावेश होता. त्यामुळे टेकडी लवकर हिरवी दिसू लागली खरी, पण स्थानिक परिसंस्थेस धोका निर्माण झाला.

स्थानिक परिसंस्थेला निर्माण झालेला हा धोका लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली होती. आता मात्र ही चूक सुधारण्याचा निर्णय वनखात्याने घेतला असून, टप्प्याटप्प्याने परदेशी वृक्ष तोडून त्या जागी स्थानिक

रोपे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मपुढारीफने शनिवारी या टेकडीची पाहणी केली असता मोठमोठे वृक्ष तोडलेले आढळून आले.

वनविभागाच्या अधिका-यांना फोनचे वावडे
तळजाई टेकडीवरील वृक्षतोडीसंदर्भात मपुढारीफच्या प्रतिनिधीने वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक शेडगे, वनसंरक्षक संकपाळ यांना वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. वनविभागाच्या अधिका-यांना फोनचे मवावडेफ आहे की काय असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून विचारला जात आहे.

देशी वृक्षांची हेळसांड
गेल्या तीन ते चार दिवसांत वनविभागाकडून ग्लिरिसीडिया वृक्षांची तोड सुरू झाली असून, त्याला आमचा विरोध नाही. परंतु, त्याठिकाणी देशी वृक्षांची ही मोठ्या प्रमाणात तोड होत असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नाही. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आपल्या गेलेल्या व्यक्तींच्या आठवणींमध्ये येथे वृक्षांची लागवड केली असून, तेही वृक्ष तोडलेली आहेत. वन विभागाचा एकही अधिकारी याठिकाणी फिरकत नाही. त्यांनी देशी वृक्षांचे संवर्धन करावे.
                                                     – दिलीप डाखवे (पर्यावरणप्रेमी व अभ्यासक)्र्र्र्र्र्र्र

या वृक्षांना फटका
वनविभागाच्या तळजाई टेकडीवर विविध जातींचे 10 ते 12 हजार वृक्ष आढळून येतात. बरतोंडी, हिवर, पिंपळ, वड, खैर, शिरीष, चाफा, चिंच, चंदन, लिंब यांसारख्या देशी वृक्षांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यापैकी अनेक वृक्ष तोडल्याचे आढळून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT