पुणे

पिंपरी : पुरस्कार सोहळ्यामुळे मान्यवरांचे दर्शन घडते

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांचे दर्शन घडते. पुरस्कारार्थीचे त्या-त्या क्षेत्रात अमूल्य योगदान असते. अशा ज्येष्ठांसमोर नतमस्तक होण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी केले. उद्धवश्री 2023 पुरस्काराचा वितरण सोहळा संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झाला. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमात माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, गुलाबराव गरूड, सुलभा उबाळे, युवराज कोकाटे, माधव मुळे, दस्तीगीर मनियार, अनिता तुतारे, अनंत कोर्‍हाळे, गोपाळ मोरे व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात राजीव जगताप (शैक्षणिक), रणजित काकडे (उद्योजक), डॉ. राजू शेट्टी, डॉ. राजेंद्र वाबळे (वैद्यकीय) डॉ. कैलास कदम, काळूराम लांडगे (कामगार), हभप प्रशांत मोरे (अध्यात्म), तैय्यब शेख, विनोद पाटील (सामाजिक), पंडित रघुनाथ खंडाळकर, माधुरी पवार, ऐश्वर्या काळे, माधव अभ्यंकर, प्रज्ञा फडतरे (कला), भारत वाव्हळ, मदन कोठुळे (क्रीडा), डॉ. प्रवीण बडे (आयुर्वेद) आणि प्रसन्न तरडे (पत्रकारिता) यांना उद्धवश्री 2023 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश
देण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना हभप प्रशांत मोरे म्हणाले की, जीवनात यश व अपयश हे येत राहते. संकटावर मात करीत जीवन जगले पाहिजे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने असलेल्या या पुरस्कारामुळे पुरस्कारार्थींना नवी ऊर्जा मिळाली आहे. तसेच, पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. माजी आमदार अ‍ॅड. चाबुकस्वार यांनी प्रास्ताविक केले. गुलाबराव गरूड यांनी आभार मानले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT