गड्यांनो, फोटो घेताना लक्ष ठेवा: उपमुख्यमंत्री file photo
पुणे

गड्यांनो, फोटो घेताना लक्ष ठेवा: उपमुख्यमंत्री

कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढतोय, याची आम्हाला कल्पना द्यावी

पुढारी वृत्तसेवा

बारामती: वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौर्‍यात एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना सल्ला दिला. गड्यांनो, आमच्यासोबत कोण फोटो घेतोय याची काळजी घ्या, असे आवाहन पवार यांनी केले.

पवार म्हणाले, आपले फोटो कार्यक्रमात कोणासोबतही काढले जातात. परंतु, काही वेळा याची किंमत मोजावी लागते. अलीकडे गर्दी वाढत आहे. सगळ्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो. पण, फोटो नाही काढू दिला, तर नाराजी होते अन् गडी बदलला, असे म्हणतात. अशातच एखादा नवीन गडी येतो, फोटो काढून जातो आणि पुढे वाटच लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढतोय, याची आम्हाला कल्पना द्यावी.

या वेळी अजित पवार यांनी वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटो प्रकरणावरून भाष्य केले. सध्या राजकारण काय चाललंय ते पाहा. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो. सगळं आकरीतच घडत आहे. त्यामुळे यदाकदाचित कोणा चुकीच्या माणसाचा फोटो माझ्यासोबत काढला, तर ते मला माहिती नव्हतं, तो चुकून काढला आहे, असे मी सांगेन. मी पोलिसांनाही सांगितले आहे की, कार्यक्रमात असे कोणी फोटो काढत असतील, त्यावर लक्ष द्या. दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT