पुणे

पुणे : शंभरावे नाट्यसंमेलन आता नव्या कार्यकारिणीच्या कारकिर्दीतच

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन व्हावे, असे नाट्यरसिकांना वाटत असले; तरी आता नाट्यसंमेलन नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर होऊ शकेल, असे बोलले जात आहे. कारण, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत मार्च 2023 मध्ये संपुष्टात येत असल्याने त्यानंतर अस्तित्वात येणार्‍या नवीन कार्यकारिणीकडूनच शंभरावे नाट्य संमेलनाचे आयोजन होऊ शकेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाट्य परिषदेतील अंतर्गत वादामुळे शंभरावे नाट्यसंमेलन होऊ शकलेले नाही. या संमेलनासाठी ज्येष्ठ दिर्ग्दशक डॉ. जब्बार पटेल यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. परंतु, नाट्य परिषदेतील वादामुळे संमेलनाचे आयोजन रखडले आहे. आता विद्यमान कार्यकारिणीची मुदत मार्च 2023 मध्ये संपुष्टात येत असल्याने त्यानंतर अस्तित्वात येणार्‍या नवीन कार्यकारिणीकडूनच शंभरावे नाट्यसंमेलनाचे आयोजन होऊ शकेल, असे चित्र आहे.

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील महाजन म्हणाले की, नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण? यासंदर्भात संभ—म निर्माण झाला आहे. मार्चमध्ये नाट्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणी मुदत संपत असून, आता लवकरच विश्वस्तांना पत्र पाठवून याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही करीत आहोत. गेल्या दोन वर्षांत नियामक मंडळ आणि कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. लवकरच परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत.

अध्यक्षपदाच्या संबंधीचा वाद काय?
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासह कार्यकारिणी मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप करून नियामक मंडळाच्या सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला. कांबळी यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने ते अध्यक्ष नाहीत, असे नियामक मंडळाच्या सदस्यांचे म्हणणे आहे. मंडळाने नरेश गडेकरांना हंगामी अध्यक्ष जाहीर केले. मात्र, त्यानंतर परिषदेच्या अध्यक्षपदाचा वाद धर्मादाय आयुक्तांच्या कोर्टात गेला.

आम्हाला कोणीही पाठिंबा दिलेला नाही. नियामक मंडळाच्या 60 पैकी 40 सदस्य आमच्याविरोधात आहे. आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना अमान्य आहे. त्यांनी आम्ही आयोजिलेल्या सभांना येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे 100 वे नाट्यसंमेलन होण्याचा सवालच येत नाही. मार्च 2023 मध्ये कार्यकारिणीची पाच वर्षांची मुदत संपत आहे. डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असून, मार्चनंतर निवडणुका होतील. जी नवी कार्यकारिणी निवडून येईल ते नाट्यसंमेलन आयोजित करतील.

                                                              – शरद पोंक्षे, नाट्य परिषद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT