Arrested Pudhari
पुणे

Telegram Exam Paper Scam: टेलिग्रामवर दहावी प्रश्नपत्रिका विक्री प्रकरणात चंद्रपूर तरुण अटकेत

क्यूआर कोडद्वारे पैसे घेऊन विद्यार्थ्यांना फसवणूक; पोलिसांनी तांत्रिक तपासातून प्रकरण उघड केले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दहावीच्या प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आमिष दाखवत पैशांसाठी विद्यार्थ्यांच्या भावनांशी डिजिटल खेळ करणाऱ्या 18 वर्षीय तरुणाला चंद्रपूरमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पेपरफुटी झालीच नसून, हा ‌‘डिजिटल‌’ बनाव असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

दहावीच्या परीक्षेदरम्यान पेपर परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग््रााम ग््रुापवर उपलब्ध झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या तक्रारीनुसार 9 मार्चचा पेपर चक्क 6 मार्चलाच ग््रुापवर दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी पुणे बोर्डाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तपासादरम्यान पोलिसांना आरोपीने प्रश्नपत्रिका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळण्यासाठी वापरलेला ‌‘क्यूआर कोड‌’ मिळाला. हा कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित तरुणाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ‌‘फोनपे‌’ कंपनी तसेच टेलिग््राामकडून तांत्रिक माहिती मिळवली.

या तपासादरम्यान पोलिस अंमलदार तेजस चोपडे आणि गणेश जाधवर यांनी तांत्रिक तपास करून आरोपी चंद्रपूरमधील असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तत्काळ एक पथक चंद्रपूरला रवाना करून 18 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार गणपत वालकोळी आणि अर्जुन कुडाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

...अशी केली विद्यार्थ्यांची फसवणूक

आरोपी टेलिग््रााम ग््रुापवर आधी एक ‌‘लॉक‌’ केलेली पीडीएफ फाईल टाकून तोच बोर्डाचा मूळ पेपर असल्याचा बनाव करायचा. प्रत्यक्ष पेपर झाल्यानंतर टेलिग््रााममधील ‌‘एडिट‌’ पर्यायाचा वापर करून त्या जुन्या फाईलच्या जागी झालेला खरा पेपर अपलोड केला जात असे. फाईल बदलली तरी टेलिग््राामवर तिची अपलोडिंग वेळ जुनीच राहत असल्याने विद्यार्थ्यांना पेपर आधीच ‌‘लीक‌’ झाल्याचा भास होत असे. या फाईलचा पासवर्ड देण्यासाठी आरोपी क्यूआर कोडद्वारे प्रत्येकी 600 रुपयांची मागणी करायचा. पैसे मिळताच तो संबंधित विद्यार्थ्याला थेट ‌‘ब्लॉक‌’ करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

संबंधित प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाला अटक केली आहे. तांत्रिक पद्धतीने त्याने हा प्रकार केला असून, त्याच्याकडे आणखी तपास सुरू आहे.
कृषिकेश रावले, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT