पुणे

पुणे : तंत्रज्ञानावर आधारित संशोधन वाढायला हवे; प्रा. के. एन. गणेश यांचे मत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : इंटरनेट ऑफ थिंग्ज, कृत्रिम बुद्धिमत्ता व डाटा विज्ञान, अशा बहुआयामी तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांवरील गुंतवणूक वेगाने वाढत आहे. अशावेळी तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन विषयांवर संशोधन वाढायला हवे. या क्षेत्रात येणार्‍या अडचणींवर, डेटा प्रायव्हसीवर उपाय शोधायला हवेत, असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे संचालक प्रा. के. एन. गणेश यांनी व्यक्त केले. एआयएसएसएमएस आयओआयटी महाविद्यालयात मइमर्जिंग स्मार्ट कॉम्प्युटिंग अँड इन्फॉर्मेटिक्स ईएससीआय-2023फ विषयावरील पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली.

या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रा. के. एन. गणेश यांनी आपल्या भाषणादरम्यान इंटरनेट ऑफ थिंग्ज, 5 जी तंत्रज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिग डेटा या नवनवीन तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर नावीन्यपूर्ण विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याबद्दल त्यांनी मएआयएसएसएमएसफचे अभिनंदन केले.

स्मार्ट कंप्युटिंग, नेटवर्किंग, कम्युनिकेशन, ऑटोमेशन, आयओटी, सिग्नल आणि इमेज प्रोसेसिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिग डेटा अशा उदयोन्मुख ट्रेंडला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि जागतिक स्पर्धकांना त्यांचे विचार व अनुभव सांगण्याची संधी उपलब्ध करून देणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. या परिषदेसाठी 810 शोधनिबंध प्राप्त झाले. त्यापैकी 134 शोधनिबंध सादर करण्यात येतील, असे परिषदेच्या तांत्रिक समन्वयक डॉ. मीनाक्षी थलोर यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष एआयएसएसएम सोसायटीचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी परिषदेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. एआयएसएसएमएस आयओआयटीचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांनी परिषदेच्या आयोजनावर प्रकाश टाकला. या वेळी थायलंडच्या चेंग माई युनिव्हार्सिटीचे सहायक प्राध्यापक एकार्त बुंचेंग, एआयएसएसएमएस संस्थेचे खजिनदार अजय पाटील आयईईईचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष अमर बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुरेश लिमकर यांनी केले. परिषदेचे प्रमुख आयोजक डॉ. वाय. पी. पाटील यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT