ओतूर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे गावच्या हद्दीतील दत्तवाडी येथे महामार्गावर भरधाव धावणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बसल्याने तरस हा वन्यप्राणी जागेवरच ठार झाला. स्थानिक नागरिकांनी याबाबत वनविभागाशी संपर्क करून माहिती दिली असता ओतूर वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मयत तरस ताब्यात घेतल्याचे समजते.
दरम्यान कल्याण-नगर महामार्गावर अलीकडच्या काळात अज्ञात वाहनाच्या धडकेने होणाऱ्या अपघातात दुर्मिळ वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागत आहेत, ही बाब दिवसेंदिवस चिंताजनक बनली आहे. वाहन चालकांनी रात्रीच्या सुमारास महामार्गावर प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवत भक्षाच्या शोधात नजरचुकीने रस्त्यावर आलेल्या वन्यप्राण्यांबाबत योग्य ती दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.
हेही वाचा :