पुण्याची ग्रामदेवता म्हणजे तांबडी जोगेश्वरी देवी... पुण्याची ग्रामसंरक्षक देवता... देवीचे मंदिर हे पुण्याच्या गजबजलेल्या भागात आहे. प्रत्येक भाविक देवीकडे नवस बोलतात आणि त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण होते. पुण्यात देवींची अनेक मंदिरे आहेत. परंतु, प्राचीन काळापासून पुण्याची ग्रामदेवता म्हणून अग्रपूजेचा मान आहे तो तांबडी जोगेश्वरीला...
पुण्याची योगेश्वरी म्हणजेच जोगेश्वरी ताम—वर्णी म्हणजेच तांबडी आहे. म्हणून तिला ‘तांबडी जोगेश्वरी’ असे नाव प्राप्त झाले. ‘देवी भागवत’, ‘मार्कंडेय पुराण’, ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथांत ताम—वर्णी जोगेश्वरीची कथा आहे. महिषासिराचे अंधक, उद्धत, बाष्कल, ताम— वगैरे बारा सेनापती होते. त्या सेनापतींपैकी ताम—ासुराचा वध करणारी ती ताम— योगेश्वरी, म्हणजेच पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी. म्हणजे शेंदूर चर्चिला जातो म्हणून देवीचे नाव ‘तांबडी जोगेश्वरी’ असे पडले नसून, ताम—ासुराचा वध करणारी पराक्रमी देवता म्हणून देवीचे नाव तसे पडले आहे. तांबड्या जोगेश्वरीची मूर्ती स्वयंभू आहे. ती चतुर्भुज आणि उभी आहे. ती मातेश्वरी, सावित्री आणि चामुंडा अशी देवत्रयात्मक आहे. तिच्या वरच्या उजव्या व डाव्या हातांत डमरू व त्रिशूळ आहे. खालच्या हातात पानपात्र आहे. ही मूर्ती कुठल्याही वाहनावर नाही, उभी आहे. सव्वा हात उंचीची मूर्ती सुटी नसून, तिच्या पाठीमागे पाषाण आहे. बेंद्रे घराण्याकडे जोगेश्वरीची पूजा आहे.
जोगेश्वरीचा मुख्य उत्सव म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत होणारा नवरात्रोत्सव. पूर्वी जोगेश्वरीची दसर्याच्या पालखीची मिरवणूक पेठेतून निघे आणि दसर्याचा समारंभ मोठ्या थाटात होई. दरवर्षी नवरात्रात तर देवीच्या दहा अवतारांच्या मूर्ती वाहनांसह बसवतात. नवकुमारिकांचे पूजन होते, होम होतो, लोक होमातील रक्षा भक्तिभावाने नेतात. म्हणूनच नवरात्र उत्सव हा मंदिरात थाटात साजरा केला जातो.
पुण्यातील जुन्या मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर म्हणजे पुण्याची ओळख. नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येने मंदिराला भेट देतात. प्रथा आणि परंपरेप्रमाणे मंदिरात पूजाअर्चा होते. यंदा उत्सवात देवी विविध रूपांमध्ये आणि वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ झालेली पाहता येणार आहे. दिवसभर भाविकांना दर्शन घेता येईल.विनायक बेंद्रे, विश्वस्त,ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर