पुणे: बाणेर पोलीस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना पाच हजारांची लाच मागू तीन हजार रुपये घेतल्याच्या आरोपावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. कॉप्स २४ चे बीट मार्शल म्हणून हे तिघे काम करत होते.
पोलिस उपायुक्त गुन्हे निखील पिंगळे यांनी या बाबतचे आदेश दिले आहेत. पोलिस अंमलदार संतोष जगु शिंदे, प्रतिक महेश त्रिंबके, दिनेश संतोष इंगळे अशी त्यांची नावे आहेत.बाणेर परिसरात हे तिघे बीट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. पाषाण येथील शिवालय सोसायटीमध्ये पार्किंगच्या फ्लोरिंग चे काम चालू होते. सकाळी काम चालू करणार होते. मात्र मशीन मिळाले नाही. दुपारी काम सुरू झाले. रात्री साडे अकरा वाजता बीट मार्शल तेथे गेले.
"का काम सुरु केले आहे. बंद करुन टाका, तुमच्या विरुध्द डायल ११२ वर तक्रार आली आहे. "तुम्ही आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला" असे म्हणाले. त्या दोन्ही पोलीसांपैकी एकाने तुम्ही एक काम करा, आम्हाला थोडे पैसे द्या, तुमचे काम १५ ते २० मिनिटात पूर्ण होईल, परत कोणाची तक्रार आली तर आम्ही अर्ध्या तासाने येतो, अर्ध्या तासाने आम्ही आल्यानंतर काम सुरु नाही पाहीजे" असे म्हणाला. सोसायटीच्या चेअरमनने विचारले किती पैसे . त्यावेळी तिघांनी संगणमत करुन ५०००/- रुपयांची मागणी करुन तडजोड अंती ३०००/- रुपये स्विकारले आहेत.