पुणे

सुरमई, रावस, पापलेट महागला; बाजारात मासळीची आवक कमी

अमृता चौगुले

पुणे : देशाच्या पूर्व किनारपट्टी क्षेत्रातील मासेमारी बंद झाली आहे. सध्यस्थितीत पश्चिम किनारपट्टीवरून मासळी बाजारात दाखल होत आहे. बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात होत असून मागणी जास्त असल्याने हलवा, सुरमई, रावस, पापलेटचे दर पाच ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत. तर, बोंबील, बांगडा, कोळंबीसह लहान मासळीसह उर्वरित सर्व प्रकारच्या मासळीचे दर टिकून होते. इंग्लिश, गावरान अंड्यासह चिकन, मटणाचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते.

बाजारात पक्ष्यांची उपलब्धता कमी प्रमाणात होत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या पक्षांच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने चिकनच्या भावात किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे. याखेरीज, इंग्लिश अंड्यांच्या भावातही शेकड्यामागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. गावरान अंडी व मटणाचे भावही गत आठवड्याच्या तुलनेत टिकून असल्याचे सांगण्यात आले.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 28) खोल समुद्रातील मासळीची 12 ते 15 टन, खाडीच्या मासळीची 200 ते 300 किलो, तर नदीच्या मासळीची एक टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1600-1800, मध्यम : 1400-1500, लहान : 900-1000, भिला : 600-700, हलवा : 800-900, सुरमई : 900-1000, रावस : 800, घोळ : 700, करली : 400-440, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 360-400, पाला : 1000-1200, वाम : काळी 360-400, पिवळी 800-900, ओले बोंबील : 140-200. कोळंबी : लहान 180-320, मोठी : 360-480, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 700, लॉबस्टर : 1800-2000, मोरी : 400, मांदेली : 100-140, राणीमासा : 200-240, खेकडे : 240-300, चिंबोर्या : 480-550. खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 360-400, नगली : 400-480, तांबोशी : 440-480, पालू : 240-280, लेपा : 240-280, बांगडा : लहान 100-120 मोठा 140-160, शेवटे : 200-240, पेडवी : 100-120, तिसर्या : 240-280, तारली : 140-180. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 440-480, शिवडा : 280-320, खवली : 240-280, आम्ळी : 140-160, खेकडे : 400-440, वाम : 500-550. मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 230, लेगपीस : 280, जिवंत कोंबडी : 160, बोनलेस : 330. अंडी : गावरान (शेकडा) 920, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 520, डझन 72, प्रतिनग 6.

SCROLL FOR NEXT