यूपीएससी परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध Pudhari File Photo
पुणे

UPSC Exam: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध

Upsc Exam hall tickets आयईएस आणि आयएसएस परीक्षा 20 ते 22 जूनदरम्यान देशभरात घेतल्या जाणार आहेत

अमृता चौगुले

Upsc Exam hall tickets available

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने भारतीय आर्थिक सेवा (आयईएस) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) या परीक्षांचे हॉलतिकीट उपलब्ध केले आहे. सर्व नोंदणीकृत उमेदवारांना त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रांचा वापर करून https://upsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून हॉलतिकीट डाऊनलोड करता येईल, असे यूपीएससीने स्पष्ट केले आहे.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, आयईएस आणि आयएसएस परीक्षा 20 ते 22 जूनदरम्यान देशभरात घेतल्या जाणार आहेत. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर ई-प्रवेशपत्राची छापील प्रत घेऊन जाणे आवश्यक असणार आहे. पोस्टाने कोणतेही भौतिक प्रवेशपत्र पाठवले जाणार नसल्याचे यूपीएससीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर मुखपृष्ठावर उपलब्ध असलेल्या आयईएस आणि आयएसएस ई-प्रवेशपत्र 2025 लिंकवर क्लिक करा. लॉगिन फील्डमध्ये जन्मतारखेसह नोंदणी आयडी प्रविष्ट करून लॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर दिसणारे आयईएस आणि आयएसएस 2025 ई-प्रवेशपत्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून त्यांची प्रिंट घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT